Wednesday, October 1, 2008

पदार्थांचा ताजेपणा आणि प्रत कसे ओळखावे ( ही माहिती माजी नाही टी नेट वरुण संगरहित केले आहे )

पालेभाज्या १. पालक : पावसाळ्यात पालकाची पाने मोठी असतात। एरवी ती मध्यम आकाराची असतात. याची बहुदा खुडलेली पानेच मिळतात. तर या पानांचे देठ करकरीत असावेत. जुडी उभी धरुन बघावी. पाने ताठ राहिली पाहिजेत.
२। मेथी : मोठ्या पानांची आणि बारिक पानांची असे दोन प्रकार मिळतात. मोठ्या मेथीची पाने जरा काळपट असतात. ती किंचीत जास्त कडु असतात. या दोन्ही जुड्या ताज्या असाव्यात. जुडीच्या मधल्या भागाचा वास ताजा आला पाहिजे. तसेच मेथी फ़ुलावर आलेली नसावी. मुंबईत समुद्री मेथी मिळते. तिच्या बारिक जुड्या असतात. त्याची मुळे पांढरीशुभ्र असावीत. ३. अंबाडी : हिरव्या देठाची आणि लाल देठाची असे दोन प्रकार असतात. पाने त्रिकोणी असतात. लाल देठाची जास्त आंबट व जास्त चवदार असते. याची पाने ताठ असावीत. जुडीत मोठी पाने जास्त असावीत. कळ्या किंवा बोंडे नसावे. ४. शेपु : जुडी डोल्याना हिरवीगार दिसावी. पिवळी छटा नसावी. स्पर्षाला करकरीत लागावी. ताजा वास यायला हवा. ५. माठ : पाने हिरवीगार असावीत. पानांच्या मागील बाजुस पांढरे डाग नसावेत. तुरे शक्यतो नसावेत. जुडीत अगदी कोवळी रोपे नसावीत. ६. लाल माठ : पाने तेजस्वी लाल असावीत. कोवळी रोपे नसावीत. तुरे नसावेत. पानाना छिद्रे नसावीत. ७. चवळी : चवळीच्या शेंगाचे जे वेल असतात त्याच्या कोवळ्या तुर्‍यांची हि भाजी असते. यातले तुरे ताठ असावेत. जुन पाने कमी असावीत. यांच्या तुर्‍याचीच भाजी करतात. ८. राजगिरा : राजगिर्याची पाने बर्‍यापैकी मोठी असतात. यात कोवळे तुरे असावेत. देठ फ़ार जुन नसावेत. ९. करडई : पाने लांबट व किंचीत दंतुर असावीत. रोप ऊंचीला फ़ार असु नये. पाने फ़ार कोवळीहि असु नयेत. पानाच्या कडेचे काटे पण ताठ असावेत. १०. शेवग्याचा पाला : पाने कोवळी असावीत. तसेच जुडी झटकली तर पाने गळु नयेत. देठाची टोके जास्त जुन असु नयेत. पाने फ़ार कोवळी पण असु नयेत. ११. लाल भोपळ्याचा पाला : पाने फ़ार जुन असु नयेत. देठावरची लव फ़ार टोचणारी नसावी. टेन्ड्रिल्स फ़ार नसावीत. दोन पेरांमधले अंतर फ़ार असु नये. १२. हरभर्‍या पाला : हा खुडलेलाच असतो. तो हिरवागार दिसावा व कोवळा असावा. पिवळसर छटा नसावी. फ़ुले नसावीत. १३. अळु : काळ्या देठाचा घ्यावा. पाने फ़ार रुंद नसावीत. पानांच्या कडा सुकलेल्या नसाव्यात. पाने फ़ाटलेली नसावीत. वडीचे अळुची पाने फ़ार रुंद नसावीत. १४. कोरल : कोरलाची पाने आपट्याच्या पानासारखी असतात. पण ती पोपटी व कोवळी असावीत. हि पाने खुडुन फ़ुलपुडी सारखी बांधुन आणतात. ती पुडी ऊघडुन परत बांधुन घ्यावी. १५. कोचिंदा किंवा फ़ोणशी : पावसाळ्यात मिळणारी हि गवतासारखी दिसणारी भाजी. याचे देठ शुभ्र असावेत. पाने फ़ार जुन असु नयेत. १६. रव : मेथीसारखीच पण जाडसर पानाची असते हि भाजी. याचे देठ लालसर असावेत. पाने फ़ार जुन नसावीत. फ़ुले आलेली असु नयेत. १७. मायाळु : मायाळुची पाने लाल किंवा हिरवी असतात. ती चकचकीत असावीत. फ़ुलांचे किंवा फ़ळांचे तुरे असु नयेत. यातले देठ पण वापरायचे असल्याने ते फ़ार जुन असु नयेत. १८. आंबट चुका : याची पाने आमटीत किंवा अळु बरोबर वापरतात. हि पाने गोलसर आकाराची असतात. हि पाने फ़ार बारिक असु नयेत. तसेच ती ताठ असावीत. १९. माचोळ : या भाजीला माश्यासारखा वास व स्वाद असतो. हिला पाने नसतात. फ़क्त देठच असतात. या भाजीत मीठ घालावे लागत नाही. हि भाजी पोपटी रंगाची असावी. पिवळी वा तपकिरी छटा नसावी. २०. घोळ : हिची जमिनीवर पसरत जाणारी वेल असते. लाल देठ असतो व बारिक पाने असतात. हि पण खुडलेलीच मिळते. यात पानाचे प्रमाण जास्त असावे. यात जरा मोठ्या पानांचा राजघोळ नावाचा प्रकार असतो. २१. मुळा : यात नुसती पाने वा मुळ्यासकट पाने असेहि मिळतात. मुळा फ़ार रुंद असु नये. त्यातला शेंड्याकडचा भाग फ़ार हिरवा असु नये. फ़ुलांचे तुरे नसावेत. पानावर टोचणारी लव नसावी. लाल मुळ्यांच्या पानाची भाजी करत नाहीत. पण ते तीन सेमी पेक्षा जास्त रुंद नसावेत. २२. चंदन बटवा : याची पाने नाजुक असतात व मधले पान जांभळे असते. पण हि भाजी लगेच मान टाकते त्यामुळे पाने फ़ार ताजी मिळत नाहीत. देठ बारिक पण ताठ असावेत. २३. शेवळे : हे कोंबासारखे दिसतात. लालसर तपकिरी रंगाचे असतात. याची वरची व खालची टोके सुकलेली नसावीत, खालचे टोक फ़ार रुंद नसावे. तसेच ते टोक फ़ार लाल नसावे. पाने घट्ट चिकटलेली असावीत. सुटी नसावीत. २४. बा.बुचे कोंब. : हे विकणे भारतात बेकायदेशीर आहे. तरिहि घेतलेच तर त्याचे बुड दोन ईंचापेक्षा जास्त रुंद नसावे. वरचे टोक फ़ार काळसर असु नये. तळाचा कापलेला भाग पिवळसर पांढरा असावा. याच्या चकत्या करुन पाण्यात चोवीस तास भिजत घालुन, ते पाणी फ़ेकुन द्यायचे असते, कारण या कोंबात विषारी द्रव्ये असतात. हत्ती वैगरे प्राण्यानी बांबुचे कोवळे कोंब खाऊन फ़स्त करु नयेत म्हणुन निसर्गाने योजलेला हा ऊपाय आहे. २५. सरसो : सरसो म्हणजे मोहरीचा पाला. हा मुळ्याच्या पानासारखाच दिसतो. तो फ़ार जुन नसावा. तसेच पिवळट छटा नसावी. फ़ुले नसावीत. २६. चवळाई, तांदुळजा, भारंगी, मसाल्याची पाने, रताळ्याचा पाला, सुरणाचा पाला ईत्यादी भाज्या जाणकारच्या सल्ल्यानेच घ्याव्या.

No comments: